Ad will apear here
Next
पुण्यात नऊ डिसेंबरला ज्योतिषी संमेलन
पुणे : गुरुकुल विश्वपीठातर्फे नऊ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मौलाना आझाद सभागृह (कोरेगाव पार्क) येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत होईल,’ अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी दिली.

ज्येष्ठ कवयित्री व ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू मोडक, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर, गुरुकुल विश्वपीठाचे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी, संयोजक पल्लवी भागवत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सिद्धेश्वर मारटकर हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. समारोप पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. समारोप सत्राला महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात उद्घाटन सत्रानंतर ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मारटकर २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने भाकितावर प्रकाश टाकणार आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष, ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष, नक्षत्र आणि ज्योतिष, नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे या संमेलनात होणार आहेत.

ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे, डॉ. श्रीहृदय भागवत, रजनी साबदे आदी मान्यवर विविध व्याख्यान सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे ज्योतिष क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव प्रदान, पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत.  

संमेलनाविषयी :
दिवस :
रविवार, नऊ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी सकाळी १० ते सायंकाळी पाच
स्थळ : मौलाना आझाद सभागृह, कोरेगाव पार्क, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZXHBV
Similar Posts
अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन पुणे : गुरुकुल विश्वपीठातर्फे आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री, ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू-मोडक यांच्या हस्ते नऊ डिसेंबर २०१८ रोजी झाले.
मुख्‍यमंत्र्यांच्या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन पुणे : पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम ‘स्वराज्य’ या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवेकालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व ‘स्वराज्य’ क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
पुण्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता पुणे : दिव्य ज्योती परिवार आणि दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या शिष्या आणि भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language